CJI Gavai Post-Retirement-निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय पद स्वीकारणार नाही: सरन्यायाधीश भूषण गवई

निवृत्तीनंतर आपण कोणत्याही प्रकारचे शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे स्पष्टपणे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावती येथे स्पष्ट केले.भूतपूर्व सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतरही शासकीय लाभाचे पद स्वीकारण्याच्या पार्श्वभूमीवर गवई यांच्या या निर्णयाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

उच्चपदस्थ व्यक्तींची सेवानिवृत्ती झाल्यावर खरंच पद स्वीकारणे योग्य आहे का?

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, न्यायाधीश पंतप्रधान इत्यादी महत्त्वाची पदे स्वीकारल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर खरंच त्यांना इतरही लाभाची पदे स्वीकारणे आवश्यक आहे का? हा एक चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय जनतेला उच्च पदस्थ व्यक्तीने सेवानिवृत्तीनंतर स्वीकारलेले पद हे आवडत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर शासकीय लाभाचे पद स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली. त्यांनी यापूर्वी घेतलेल्या निर्णयावरही आता टीका होत आहे. त्यामुळे सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावती येथे बोलताना आपला निर्णय सर्वांना सांगून टाकला, की मी सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही शासकीय लाभाच्या पदावर विराजमान होणार नाही. सेवानिवृत्तीनंतरचा सर्व काळ माझ्या दारापूर गावीच व्यतीत करणार आहे. कारण दारापूर गाव हे माझ्यासाठी अभिमान आहे असेही गवळी यांनी स्पष्ट केले. गवळी यांच्या भूमिकेबद्दल सर्वांना निश्चितच आनंद वाटेल. त्याचबरोबर त्यांनी आपल्या न्यायालयीन कारकिर्दीमध्ये उत्तमोत्तम निर्णय घेऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करावे अशीच जनतेची अपेक्षा आहे.

Leave a comment