Kalammawadi Dam Kolhapur-दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून विसर्ग चालू, पावसाचा जोर वाढला

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणजे दूधगंगा धरण होय. हे धरण काळम्मावाडी धरण म्हणूनही ओळखले जाते. हे धरण 25.39 टीएमसीचे असून या धरणात रविवार दिनांक 27 जुलै 2025 पर्यंत 21 टीएमसी पाणी साठा साचलेला आहे. त्यामुळे दूधगंगा धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झालेला आहे. दूधगंगा धरणाची पाणीसाठा क्षमता ही 28 टीएमसी असली तरी धरणाच्या कमकुवतपणामुळे 25.39 टीएमसी पर्यंतच पाणी साठवले जाते.

दूधगंगा धरण

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीवर काळम्मावाडी या ठिकाणी दूधगंगा धरणाचे उद्घाटन 1977 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. त्यावेळी इंदिरा गांधी हेलिकॉप्टरने काळम्मावाडी येथे आल्या होत्या. त्यानंतर बरेच वर्षे धरणाचे बांधकाम चालू होते. धरणाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्यामुळे सध्या धरणातून प्रतिसेकंद सुमारे 100 क्युसेक पाणी गळतीद्वारे विसर्जित होते. त्यामुळे धरणाच्या गळती काढण्याचे कामही सध्या चालू आहे. पावसाच्या जोरामुळे धरणाची पाणी पातळी 21 टीएमसी पर्यंत आली आहे. वाढत्या पावसाच्या जोरामुळे भविष्यात मोठा महापूर येऊ नये म्हणून दूधगंगा धरणातून सुमारे 3600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे दूधगंगा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave a comment