निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील युती सरकारने ऑगस्ट 2024 पासून कार्यान्वित केली. या योजनेचा त्यावेळी लाखो लोकांनी फायदा घेतला.सरकारनेही निवडून येण्यासाठी कानाडोळा केला; पण या लाडकी बहीण योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. अनेक बोगस खातेदार या योजनेचा लाभ घेत आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली
ऑगस्ट 2024 रोजी कार्यान्वित केलेली महाराष्ट्रतील युती सरकारने लाडकी बहीण योजना सरकारच्या चांगलीच मानगुटीवर बसलेली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्राचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्र डबघाईला आला आहे. मुळात कोणत्याही प्रकारच्या फुकटात योजना देणे हे एक प्रकारचे आमिष आहे .आणि हे काम तत्कालीन युती सरकारने केले आणि आर्थिक संकट ओढवून घेतले. आज महाराष्ट्रातील अनेक चांगल्या योजना, विकास कामे थांबलेली आहेत. ही बाब खरोखरच दुर्दैवाची आहे. ही लाडकी बहीण योजना भविष्यातही अशीच चालू राहिली तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कधी नव्हे इतकी डबघाईस येईल हे निश्चित आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनीही घेतला
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे 14 हजार 298 पुरुषांनी घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे.
अजूनही चांगल्या पद्धतीने शोध सुरू केल्यास हा आकडा 50 हजारपर्यंत जाईल असे वाटते.याशिवाय अनेक कुटुंबात लाडकी योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. पुरुष असूनही महिलांच्या नावे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. ज्यांच्या नावाबद्दल संशय आहे असे अनेक पुरुषही आहेत. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने एखाद्या योजनेचा लाभ घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे; पण सरकार यावर कोणतीही कारवाई करेल असे वाटत नाही. कारण त्यांना पुढील निवडणुकीत मते हवी असतात.
आठ लाख कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला
महाराष्ट्रातील सुमारे आठ लाख कुटुंबात लाडकी बहीण योजनेचा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे. मुळात लाडकी बहीण योजना अमलात आणताना एका कुटुंबात दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असे सरकारने धोरण ठरवले होते; पण महाराष्ट्रातील सुमारे आठ लाख कुटुंबांतील दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेत करोडो रुपये चुकीच्या पद्धतीने खर्च झालेले आहेत.
लाडकी बहीण योजना अमलात आणून सरकारला पश्चाताप झाला असला तरी ही योजना बंद करणे सरकारला खूप जड जात आहे.