Wai News-कृष्णा नदीवरील धोम धरण तुडुंब भरले, वाईचा गणपतीला महापुराचा वेढा

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरण तुडुंब भरले असून धरणाच्या दरवाजातून विसर्ग चालू झाला आहे. वाईच्या सुप्रसिद्ध गणपतीला कृष्णा नदीच्या महापुराने वेढलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेल्या कृष्णा नदीवरील दुसरे धरण म्हणजे धोम धरण होय. या धरणापासून नदीच्या उगम स्थानाकडे बलकवडी या ठिकाणी आणखी एक छोटे धरण आहे. हे कृष्णा नदीवरील पहिले धरण आहे आणि धोम हे दुसरे धरण आहे.

13.80 TMC चे धोम धरण

कृष्णा नदीच्या उगम स्थानापासून दुसऱ्या क्रमांकाचे धरण म्हणजे धोम धरण होय. हे धरण 13.80 टीएमसी असून वाई तालुक्याचे तालुक्याला समृद्ध करणारे हे धरण रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी तुडुंब भरलेले आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्यामुळे धरणाच्या दरवाज्यातून सध्या विसर्ग चालू आहे. वाई तालुक्यातील धोम धरणापासून कृष्णेच्या उगमस्थानापर्यंत प्रचंड आकर्षक आणि नयनरम्य दृश्ये पाहायला मिळतात. धोम धरण काठोकाठ भरल्यामुळे निसर्ग सौंदर्याची अविट दृश्य पाहायला पर्यटकांची गर्दी वाढलेली असते.

वाईच्या गणपतीला कृष्णेचा वेढा

वाईचा सुप्रसिद्ध गणपती कृष्णा नदीच्या काठी असून तो सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्याच्या ठिकाणी नदीकाठी असलेल्या वाईच्या गणपतीला कृष्णा नदीच्या महापुराने वेढलेले आहे. महापुराचे पाणी मंदिरातील गणपतीच्या चरणांपर्यंत पोहोचलेले आहे. हे दृश्य पाहण्यासाठी भाविक आवर्जून येतात;पण महापुराची तीव्रता पाहून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवलेला असतो.

Leave a comment