महाराष्ट्र कन्या नागपूरच्या दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावून वयाच्या 19 व्या वर्षी घवघवीत यश संपादन केले. दिव्याने साक्षात ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी या भारतीय खेळाडूला हरवून हा अतुलनीय कामगिरी केली या कामगिरीबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ.
ग्रँडमास्टर दिव्या देशमुख
वयाच्या 19 व्या वर्षी दिव्याने जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्व चॅम्पियनशिप पटकावून एक नवा इतिहास घडवला आणि ती भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनली . ही स्पर्धा फिडे येथे जर्जिया देशात आयोजित केली होती .या अगोदर द्रोणावली हरीका , रमेश बाबू वैशाली यांनी ग्रँड मास्टर हे पद पटकावले होते. त्यानंतर हे यश दिव्याने पटकावले. पुरुष गटात पाच वेळा बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथ आनंदने दिव्याच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला असून दिव्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यापूर्वी ग्रँडमास्टर पद पटकावणाऱ्या अनेक खेळाडूंनी दिव्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिव्याचे लहान वयातील हे यश पाहता दिव्या पुढील बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अतुलनीय अशी कामगिरी करेल अशी आशा संपूर्ण भारतीयांना वाटते.
दिव्याच्या अतुलनीय कामगिरीचा इतिहास
1 2010 पासून दिव्या बुद्धिबळ खेळत आहे.त्यावेळी दिव्याचे वय अवघे पाच वर्षे होते.
2 वयाच्या सातव्या वर्षी 2012 साली पुद्दुचेरी येथे अंडर 7 गटात पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. दिव्यासाठी ही खूप मोठी कामगिरी होती.
3 2013 साली इराण येथे भरलेल्या आशियाई स्पर्धेत अंडर 8 गटात दिव्याने विजेतेपद पटकावले.
4 2014 साली दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे अंडर 10 गटात दिव्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवली. आतापर्यंत या स्पर्धेत दिव्याने 40 वेळा प्रतिनिधित्व केलेले असून 23 सुवर्ण,सात रौप्य, पाच कांस्य अशी 35 पदके दिव्याने जिंकली आहेत. या देशात दिव्या फक्त पाच वेळा या स्पर्धेत हरली आहे.दिव्याची अतुलनीय कामगिरी अगदी लहान वयापासूनच उल्लेखनीय अशी राहिली आहे.
5 2020 साली फिडे येथे कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत घेतलेल्या ऑलिंपियाडमध्ये भारताच्या विजयी संघात दिव्याचा सहभाग होता.
6 2023 मध्ये दिव्याने बुद्धिबळातील इंटरनॅशनल मास्टर ही पदवी प्राप्त केली.
7 2025 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी भारताची 88 वी ग्रँड मास्टर बनण्यास दिव्याला यश प्राप्त झाले. दिव्याने ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावली, वैशाली रमेश बाबू यांच्या यादीत आपला समावेश करून घेतला आणि ग्रँडमास्टर दिव्या हा सन्मान मिळवला.
भारताने पुरुष आणि महिला बुद्धिबळ क्षेत्रात ऑलिंपियाडमध्ये अतुलनीय कामगिरी करून भारताने बुद्धिबळ स्पर्धेत धबधबा निर्माण केला आहे.