अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी भारतावर 25% टॅरिफ कर आकारून भारताला चांगलाच दणका दिला आहे.आपल्या भारताचे विद्यमान सरकार आणि पंतप्रधान मोदी हे वारंवार आपले आणि अमेरिका यांचे संबंध चांगले असल्याचे बोलतात;पण ट्रम्प यांची भूमिका पाहता भारत अमेरिका संबंध खूप चांगले आहेत असे वाटत नाही. याबाबत पाहूया सविस्तर माहिती.
ऑपरेशन सिंदूर: संसदेतील चर्चेचा संबंध…?
सोमवार दिनांक 28 जुलै 2025 आणि मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 या दोन दिवशी भारतीय संसदेत ऑपरेशन शेंदूर संदर्भात चर्चा झाली. या चर्चेत विरोधकांनी ऑपरेशन सिंदूर हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सीझ फायर केले असे म्हटले होते.त्याला मोदी यांनी उत्तर द्यावे असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सीझ फायर झाले ते दुसऱ्या कोणत्याही देशाच्या मध्यस्थीमुळे झाले नाही असे स्पष्ट म्हटले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही.त्यांना तेवढे धाडस झाले नाही. तरीसुद्धा ही बातमी अमेरिकेला समजलीच. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सीझ फायर मीच घडवून आणले असे विधान केले आणि लगेच भारतावर 25% टॅरिफ कर आकारला. भारत सरकारला हा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला खूप मोठा दणका आहे. यावर भारत सरकार कोणती भूमिका घेते हे नजीकच्या काळात दिसेल.
1 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेचा भारतावर 25% टॅरिफ कर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्याप्रमाणे 1 ऑगस्ट 2025 पासून भारतावर 25 टक्के टॅरिफ कर आकारला आहे. यामुळे भारताच्या अमेरिकेतील निर्यातीला खीळ बसणार आहे. 100 रुपयाची वस्तू अमेरिकेतील ग्राहकाला घेण्यासाठी 125 रुपये मोजावे लागणार. त्यामुळे तेथील ग्राहकांचा कल भारतीय मालाला असणार नाही असा अर्थ होतो. भारतीय व्यापार पेठेला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात खीळ बसणार आहे.
भारताच्या कोणत्या उद्योगांवर 25% टॅरिफचा परिणाम होणार
भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात वस्त्रे पाठवतो.अपेरल्सची ही मोठ्या प्रमाणात निर्यात होते. Pharmaceuticals मध्येही मोठ्या प्रमाणात निर्यात होते. शेती आणि सी फूड यांच्यामध्ये निर्यात होते. पादत्राणे, स्मार्टफोन, आयफोन या सर्व बाबींवर टॅरिफचा फटका बसणार आहे.
वस्त्रोद्योग आणि अपेरल्स मध्ये 2023 /24 या सालामध्ये 9.6 अब्ज डॉलर्सची वस्त्रे व अपेरल्सची निर्यात झाली. या क्षेत्रातील एकूण निर्यातीपैकी 28 टक्के निर्यात अमेरिकेमध्ये झालेली आहे. नव्या टॅरिफ धोरणामुळे या वस्तू अमेरिकेच्या बाजारात महाग पडणार आहेत आणि स्पर्धात्मक दृष्ट्या आपल्या भारताला त्याचा फटका बसणार आहे. भारतातील 58% गालीचा निर्यात एकट्या अमेरिकेत होते. या गोष्टीलाही खीळ बसणार आहे.
जेनेरिक औषधांमध्ये अमेरिकेची बाजारपेठ ही भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. 2024 मध्ये भारताची जेनेरिक औषधाची निर्यात 127 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली होती. नव्या टॅरिफ करामुळे जेनेरिक औषधांवर आळा बसेल आणि भारताची निर्यातही काही प्रमाणात रोखली जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मत्स्य,मांस, प्रक्रिया केलेले सीफूड इत्यादी बाबी मोठ्या प्रमाणात भारतातून अमेरिकेमध्ये निर्यात होतात. 2024 साली 2.58 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली.यावर आता 27.83% पर्यंतचा अतिरिक्त टॅरिफ कर लागू होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे या बाबींवर सुद्धा आता निर्यातीमध्ये मोठा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे.