ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिने आंतरराष्ट्रीय विश्व चॅम्पियनशिप पटकावले. जॉर्जिया देशात फिडे या ठिकाणी 2025 ची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत तिने भारताच्याच कोनेरू हम्पी हिचा पराभव करून विश्व चॅम्पियनशिप पटकावून ग्रँड मास्टर हा किताब पटकावला.ही गोष्ट भारताच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद अशी आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिव्या देशमुख हिचे शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी तिच्या घरी जाऊन अभिनंदन केले. ही गोष्ट दिव्यासाठी भूषणावह आणि अभिमानास्पद आहे. भारताच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एखाद्या खेळाडूचे घरी जाऊन अभिनंदन करण्याची ही अशी पहिलीच घटना आहे.
