Yangtze River Revival-चीनची यांगत्सी नदी जिवंत झाली,भारतातील गंगा, यमुना नद्यांचे काय?

चीन म्हटले की वाईट बातम्या काहीतरी असतील असे वाटते; पण प्रथमच चीन सरकारने एक गुड न्यूज सर्व जगाला दिलेली आहे.या गोष्टीचा भारताने आदर्श घ्यायला हरकत नाही. ती गुड न्यूज म्हणजे चीनची मृतवत झालेली यांगत्सी नदी पुन्हा जिवंत झाली आहे. भारतातील गंगा, यमुना नद्या अशाच जिवंत होतील का? भारत सरकार याबाबतीत जागरूक आहे का? याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

चीनची यांगत्सी नदी कशी जिवंत झाली? 

चीन या देशातील आणि आशिया खंडातील सर्वात मोठी नदी म्हणून चीनची यांगत्सी नदी प्रसिद्ध आहे. ही नदी पूर्णतः प्रदूषित झालेली होती आणि या नदीचे पाणी पिण्यास योग्य नव्हते. भारतातील यमुना,गंगा यासारख्या कितीतरी नदी नद्या प्रदूषित आहेत. चीनने मात्र यांगत्सी नदीच्या शुद्धीकरणासाठी खास प्रयत्न करून तिला मोकळा श्वास मिळवून दिला.आता चीनची नदी पूर्णतः वाहती झाली असून तिचे पाणी भविष्यात पिण्यासाठी निश्चितच योग्य होईल अशी आशा आहे .चीनने ज्या गोष्टींमुळे पाणी प्रदूषित होते त्या सर्व गोष्टींवर आळा घातला आणि नदीचे शुद्धीकरण करून जगाला एक आदर्श निर्माण करून दिला. म्हणूनच मृतवत असलेली चीनची यांगत्सी नदी आज पुन्हा जिवंत झाली असे म्हटले जाते. संपूर्ण जगाला पर्यावरणाच्या प्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. अनेक नद्या प्रदूषित आहेत अशा परिस्थितीत चीनने उचललेली पावले खूप चांगली आहेत. भारत सरकारने नद्यांच्या शुद्धीकरणासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. असाच सल्ला या जिवंत झालेल्या यांगत्सी नदीतून भारताने घेतला पाहिजे.

चीनने यांगत्सी नदीच्या शुद्धीकरणासाठी कोणते उपाय केले?

चीनची सर्वात मोठी नदी म्हणजे यांगत्सी नदी होय. ही नदी आशिया खंडातील सर्वात मोठी नदी आहे;पण या नदीचे पाणी पूर्णतः प्रदूषित अवस्थेत होते. आशिया खंडातील सर्वात लांब असलेल्या नदीची लांबी सुमारे 6300 किलोमीटर आहे. या नदीवर एकूण 300 बंधारे आणि छोटी छोटी धरणे होती.त्यामुळे या बंधार्‍यांमुळे आणि छोट्या छोट्या धरणांमुळे यांगत्सी नदीचा प्रवाह थांबलेला होता. त्यामुळे नदी प्रदूषित झाली होती. चीनने सर्व 300 बंधारे आणि छोटी छोटी धरणे काढून टाकली. त्यामुळे यांगत्सी नदी प्रवाहित झाली. अर्थात या प्रवाहीपणामुळेच या यांगत्सी नदीने मोकळा श्वास घेतला आहे. आणि शुद्धीकरणाच्या दृष्टीने सुरूवात झाली आहे. चीनने केलेल्या या उपायाचे स्वागतच केले पाहिजे.

भारतातील नद्यांची अवस्था

भारतात अनेक नद्या आहेत. भारत हा नद्यांचा देश मानला जातो; पण त्याचबरोबर भारतातील नद्या जेवढ्या अशुद्ध आहेत, तेवढ्या अशुद्ध नद्या अन्य कोणत्याच देशात असतील का? असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.भारतातील गंगा, यमुना, कृष्णा,गोदावरी यासारख्या असंख्य नद्या प्रदूषित आहेत.कोणत्याही नदीचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिता येत नाही. अशी अवस्था आहे. यमुना नदीत पाच टक्के सुद्धा पाणी नाही. वाहत्या नदीत फक्त मलमूत्रच आहे. अशा अनेक नद्या भारतात मृतवत झालेल्या आहेत. त्यांच्या शुद्धीकरणासाठी खंबीर पावले उचलणे गरजेचे आहे; पण भारतात अद्यापही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे भारतीयांचे आरोग्य गंभीर अवस्थेकडे झुकलेले आहे. अनेक संसर्गजन्य रोग भारतात मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. याचे मुख्य कारण हे अशुद्ध पाणी आहे.भारतीय जनतेला शुद्ध पाणी मिळत नाही आणि त्यामुळेच अनेक साथीचे आजार पसरत आहेत. पावसाळ्यात तर कावीळ,डेंग्यूसारखे रोग थैमान घालत असतात. भारत सरकारने हा चीनचा आदर्श घेऊन नद्यांच्या शुद्धीकरणासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. तीर्थक्षेत्रे बांधणीसाठी मंदिरे बांधण्यासाठी भारत कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.
या तीर्थक्षेत्रांमुळेच तर पाण्याचे मोठ्या प्रमाणात अशुद्धीकरण होते. हे सरकारला केव्हा करणार आहे? भविष्यात भारताला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच भेडसावणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने भारत सरकार आणि भारतीय लोक जागरूक नाहीत.तसे असते तर अनेक उपाय सरकारमार्फत आणि सामाजिक संस्थांमार्फत केले असते.

Leave a comment