उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये ढगफुटीने मोठे नुकसान झाले असून अनेक लोक, घरे वाहून गेल्याचे समजते. याशिवाय एक लष्करी छावणीही वाहून गेली आहे. आठ ते दहा जवान बेपत्ता आहेत.
उत्तराखंडातील धरालीमध्ये ढगफुटी झाल्यामुळे खीरगंगा नदीला प्रचंड पाण्याचा प्रवाह निर्माण झाला आहे. या प्रवाहामुळे नदीच्या काटचे 20 ते 25 हॉटेल्स, होम स्टे वाहून गेली आहेत. अनेक लोकही वाहून गेल्याची समजते.पण मृतांची आकडेवारी अद्याप समजलेली नसली तरी गंगोत्री क्षेत्रामध्ये प्रचंड पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्यटकांनी तिकडे फिरकू नये असाच संदेश निसर्गाने दिलेला आहे.