Giant Moa Bird Revival-लुप्त झालेला महाकाय मोआ पक्षी हजारो वर्षांनंतर पुन्हा जिवंत होणार!

विज्ञान कोणताही चमत्कार करू शकतो हे विज्ञानातील तंत्रज्ञानाने सिद्ध केलेले आहे. यापूर्वी अनेक चमत्कार विज्ञानाने करून दाखवलेले आहेत.आता न्यूझीलंडमधील आढळत असलेला मोआ हा पक्षी 600 वर्षांपूर्वी मानवी शिकारींमुळे नष्ट झाला होता. तो आता पुन्हा जिवंत करण्याचे स्वप्न संशोधकांनी पाहिलेले आहे. अमेरिकेतील कोलोसल बायोसायन्सेस या कंपनीचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो तो काळच ठरवेल.

कोलोसल बायोसायन्सेस कंपनीचे संशोधन कार्य 

कोलोसल बायोसायन्सेस ही कंपनी आपल्या नव्या नव्या प्रयोगामुळे नेहमीच चर्चेत आलेली आहे. या कंपनीने यापूर्वीही असेच चमत्कारिक शोध लावलेले आहेत. या कंपनीने दहा हजार वर्षांपूर्वी नष्ट झालेला डायर वुल्फ या प्राचीन लांडग्याचे पुनरूज्जीवन केल्याची घोषणा केली होती आणि त्याप्रमाणे तो डायर वुल्फ आजही अस्तित्वात आहे.

डायर वुल्फवर मोठ्या प्रमाणात टीका झाली

अमेरिकेच्या कोलोसल बायोसायन्सेस या कंपनीने डायर वुल्फ या राखाडी लांडग्याचे संशोधन करून पुनरूज्जीवन केल्यानंतर त्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती. कंपनीने जनुकीय बदल केलेले राखाडी लांडगे तयार केले आणि त्यालाच डायर वुल्फ असे नाव दिले असे अन्य संशोधकांचे म्हणणे आहे. पण कंपनीने आपण डायर वुल्फ च तयार केले असल्याचे म्हणणे मांडले आहे. डायर वुल्फ निर्माण करताना जे तंत्रज्ञान वापरले तेच तंत्रज्ञान आता मोआ हा विशाल पक्षी निर्माण करण्यामागे वापरणार आहोत आणि हा पक्षी आपण भविष्यकाळात निर्माण करून जगासमोर आणू असा या कंपनीचा आत्मविश्वास आहे.

Leave a comment