Pigeon contact lung disease-कबुतरांशी संपर्क-फुफुसांच्या आजारांचा लपलेला धोका जाणून घ्या सविस्तर

कबुतरांशी संपर्क आणि फुफुसांचे आजार

प्राणी असो की पक्षी वेगवेगळ्या प्राण्यांपासून आणि वेगवेगळ्या पक्ष्यांपासून त्यांच्या संपर्कात आल्यास वेगवेगळे आजार होतात. कबुतरांच्या वारंवार संपर्कात आल्यास कबुतरांपासूनही फुफुसांचे आजार होतात. म्हणूनच सध्या महाराष्ट्रात कबूतरखान्यावरून जो वाद चालू आहे त्या वादातून काय निष्पन्न होते ते पुढील काळ ठरवेल. पण कबुतरांच्या विष्ठांच्या संपर्क आल्यामुळे निश्चितच फुफुसांचे आजार होतात. त्यामुळे कबुतरांशी संपर्क टाळणे हेच आपल्या हिताचे आहे.

मुंबई महानगरपालिकेचा आदेश

मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कबूतरखान्यावर बंदी घालून त्यांना दाणे टाकणे बंद करण्यास सांगितले आहे. तसेच जे कबूतरखाने आहेत, ते सर्व कबूतरखानेही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात मुंबई महानगरपालिकेचा जो हेतू आहे तो अतिशय चांगला आहे. कबुतरांचा कळप एकत्र आल्यामुळे त्यांची विष्ठा मोठ्या प्रमाणात एकत्र येते आणि या विष्ठेपासून जो संसर्गजन्य आजार होतो त्या आजारामुळे आपल्या वृद्धांची, दमा असलेल्या रोग्यांची फुफुसे लवकर खराब होतात. आणि फुफुसांच्या आजारांचे प्रमाण वाढते म्हणूनच मुंबई महानगरपालिकेने कबूतरखान्यावर बंदी घातलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचीही बंदी कायम

मुंबई महानगरपालिकेने कबूतरखान्यावर बंदी घालून कबुतरांना अन्न पाणी देण्यास बंदी घातलेली होती. त्या संदर्भात कबूतरखाने चालवणाऱ्या प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती; पण मुंबई उच्च न्यायालयानेही महानगरपालिकेने घातलेले बंदी कायम केली असून कबुतरांपासून संसर्गजन्य आजार होतो हे माहीत असूनही कबूतर पाळणे चुकीचे आहे असेही सांगितले आहे. कबुतरांचा ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो असेही उच्च न्यायालयाने आपले मत मांडले आहे.

कबुतरांच्या विष्ठेपासून फुफुसांचा गंभीर आजार होतो: डॉक्टर राजन यांचे प्रतिज्ञापत्र

कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्याने संपर्कात राहिल्यास फुफुसांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे किशोरवयीन मुले, वृद्ध, दमा असलेली माणसे यांच्या फुफ्फुसावर जलद परिणाम होतो आणि गंभीर आजार होतो. असे फुफुस रोग तज्ज्ञ डॉक्टर सुजित राजन यांनी काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने कबुतरांच्या धोक्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर विचार करून डॉक्टर राजन यांनी दहा दिवसात आपले मत मांडावे असे न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यावेळी डॉक्टर राजन यांनी आपले स्पष्ट मत मांडले की कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात कायम राहिल्यास त्यांच्या विष्ठेपासून फुफुसांचा गंभीर आजार होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध माणसे आणि दमा असलेल्या माणसांना कबुतरांच्या विष्ठेचा त्रास अधिक प्रमाणात होऊन त्यांना फुफुसांचा गंभीर आजार होऊ शकतो आणि यामुळे त्यांच्या जीवितास धोकाही होत असल्याचे मत डॉक्टर राजन यांनी नोंदवलेले आहे.

Leave a comment