50% tariff on India-भारतावर 50% टॅरिफ, फटका बसला रशियाला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या बाबतीत आयात निर्यातीवर परिणाम करणारा घटक म्हणून भारतावर 50% टॅरिफ आकारला आहे. ऑलरेडी भारतावर 25% टॅरिफ सुरू आहे 15 ऑगस्ट 2025 पासून 50 टक्के टॅरिफ होणार आहे. याचा थेट परिणाम भारतावर जसा होणार आहे तसाच रशियावरही होत आहे. त्यामुळे भारताच्या टॅरिफचा रशियाला फटका बसला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारत-अमेरिका आयात-निर्यात

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होते. अमेरिकेकडून भारतातला इंधन, पेट्रोलियम पदार्थ कोळसा, विमान आणि अंतराळ यांचे भाग इत्यादी माध्यमातून सुमारे 3.46 लाख कोटी रुपयांची निर्यात होते, तर भारतातून अमेरिकेत फार्मसी, टेलिकॉम, ज्वेलरी, पेट्रोलियम, कपडे इत्यादी माध्यमातून 7.35 लाख कोटी रुपयांची निर्यात होते. आता या टॅरिफचा निश्चितच भारत अमेरिका आयात-निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे.

Leave a comment