मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात पन्नास तोळे दागिन्यांची चोरी झाली. सीपीआर मधील मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर अनिता परितेकर यांनी मुलांच्या लग्नासाठी ठेवलेल्या 50 तोळे दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. हा प्रकार सोमवारी भर दुपारी घडला. चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि सोन्यासह हिऱ्यांचे दागिने आणि 25 हजारांची रोकड लंपास केली. गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारी चोरांनी धाडसी चोरी केली आहे. डॉक्टर परितेकर यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे आपली रीतसर फिर्याद नोंदवली असून पोलीस आपले तपासाच काम करत आहेत. निश्चितच चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करतील अशी आशा आहे.
