भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातलेला पाया आणि इंदिरा गांधी यांनी त्यावर उभारलेला कळस म्हणजे इस्रो ही भारतातील नामांकित संस्था होय. या संस्थेमार्फत अंतराळातील वेगवेगळ्या माध्यमातून संशोधन करत असतात. आज इस्रोने गरुड झेप घेतली आहे. 2040 पर्यंत भारताचे अंतराळवीर चंद्रावर असतील अशी इस्रोची विद्यमान अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी घोषणा केली आहे. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने खूपच अभिमानास्पद आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने इस्रोने उचललेले हे पाऊल म्हणजे संपूर्ण भारतीयांचा विश्वास आहे.
