Pakistan threat to India-जन्मभर विसरणार नाही असा धडा शिकवू ,पाकिस्तानची भारतास धमकी

सिंधू जल कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी भारताला तुम्ही जन्मभर विसरणार नाही असा धडा शिकवू असे धमकी दिली आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया निश्चितच भारतात उमटणार आहेत. सिंधू जल स्थगिती हे वरवरचे कारण असले तरी भारत अमेरिका यांच्यात सध्या बिघडलेले वातावरण हेच मुख्य कारण असल्याचे आणि पाकिस्तानच्या अध्यक्षांना जाणीवपूर्वक असे विधान करण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याची शक्यता आहे.

गेल्या 48 तासात पाकिस्तानच्या तीन नेत्यांच्या धमक्या

गेल्या 48 तासात म्हणजे गेल्या दोन दिवसात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या तीन नेत्यांनी भारताला धमकी दिलेली आहे. यांमध्ये पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शहाबाद शरीफ, लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि माजी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा समावेश आहे.

भारत पाकिस्तान यांच्याशी आपले संबंध चांगले: अमेरिका

भारत आणि पाकिस्तान या दोन्हीही देशांशी आपले संबंध खूप चांगले आहेत असे अमेरिकेचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी असे सांगितले की हे दोन्हीही देश आणि त्यांचे क्षेत्र जगासाठी खूप चांगले आहेत त्यामुळे त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत.

Leave a comment