रशियाकडून तेल खरेदी ठेवणाऱ्या सर्वच देशांवर विशेषतः भारतावर अमेरिका दुय्यम आयात शुल्क लावणार नसल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी दिले आहेत. भारतावर असे जर अतिरिक्त शुल्क लादले तर त्याचा मोठा परिणाम भारतावर होईल असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. ट्रम्प म्हणाले की रशियाने भारतासारखा मोठा तेल ग्राहक गमावला आहे.भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत होता. चीन देखील रशियाकडून बऱ्याच मोठ्या गोष्टी घेत आहे जर मी दुय्यम आयात शुल्क भारतावर आकारले तर त्याचा मोठा परिणाम भारतावर होईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
