कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सर्किट बेंचचे उद्घाटन रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता संपन्न होत आहे. कोल्हापूरच्या मेरी वेदर ग्राउंडवर हा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
42 वर्षांच्या लढ्याला अखेर यश
गेल्या 42 वर्षापासून कोल्हापूरकर सर्किट बेंचच्या मागणीसाठी आग्रही राहिले आहेत. एन डी पाटील,गोविंद पानसरे यासारख्या अनेक नेत्यांनी यापूर्वी सर्किट बेंचसाठी मोर्चे, आंदोलने केली आहेत.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी भूषण गवई यांची निवड झाली आणि कोल्हापूरकरांचे भाग्य उघडले. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण भूषण गवई यांच्या माध्यमातून कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार होत आहे. त्यामुळे कोल्हापूरकर भूषण गवई यांच्यावर खूप खूश आहेत आणि त्यांना त्यांनी धन्यवादही दिलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगले निर्णय घेतील अशी आशा आहे.