Heavy rainfall forecast Kokan-कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला

रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी हवामान खात्याने येत्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आणि सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी त्याचा प्रत्ययही आला. सोमवारी कोल्हापूर, सांगली कोकण भागात, रत्नागिरी या भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातच पुन्हा एकदा नव्याने मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर महापुराचा फटका अनेक गावांनाही बसणार आहे. बहुतांश नद्यांची धरणे भरलेली असल्यामुळे पाणीसाठा पूर्ण झाला आहे आणि त्यामुळे महापूर अधिक प्रमाणात येणार आहे.

Leave a comment