सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्किट बेंचचे कोल्हापूरचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या अशाही सूचना त्यांनी सर्वांसमोर उच्च न्यायालयाला दिल्या.
कोल्हापूरकरांची गेल्या 42 वर्षांपासूनची सर्किट बेंचची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामुळे पूर्णत्वास आली हे जगजाहीर आहे. भूषण गवई यांनी पुढची पायरी गाठली असून त्यांनी या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूरला खंडपीठाचा प्रस्ताव द्या अशाही सूचना देऊन कोल्हापूरकरांच्या आनंदात आणखीन भर घातलेली आहे. कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे.सर्किट बेंचच्या कारभाराची सुरुवात ही लवकरच होत असल्याने अनेक जणांच्या मुंबई,नागपूर,औरंगाबाद वाऱ्या कमी होणार आहेत.