कोल्हापूर जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाण्याकडे तरुणांचा वाढता प्रवाह निर्माण झाला आहे. शहरातच काय, पण खेड्यापाड्यातही तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या एक वर्षात 800 तंबाखू खाणाऱ्या लोकांना कॅन्सरची लागण झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब गंभीर आहे. पाहूया सविस्तर माहिती.
कोल्हापूर जिल्ह्यात 800 जणांना कॅन्सरची लागण: तंबाखू हे मुख्य कारण
कोल्हापूर जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त लोकांचे सर्व सर्वेक्षण केले असता असे निदर्शनास आले की जवळजवळ आठशे जणांना कॅन्सर झाला आहे आणि त्याचे मूळ कारण हे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणे हे आहे. विशेषतः तरुणांच्यामध्ये सिगारेट ओढणे, मावा खाणे, तंबाखूजन्य पदार्थ खाणे अशा अनेक घटना घडत आहेत. त्याचबरोबर अनेकांना तंबाखूची मशिरी लावण्याची सवय आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात 800 कॅन्सर ग्रस्त सापडले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील सुमारे 942 जणांनी तंबाखू खाणे सोडले आहे.असे डॉक्टर प्रशांत वाडेकर यांनी सांगितले आहे; पण ज्या तरुणांना कॅन्सर झाला आहे त्यांचा कॅन्सर बरा करणे हे मोठे आव्हान आहे.तसेच अजूनही हजारो तरुण तंबाखूचे सेवन करत आहेत. त्यामुळे भविष्यात कॅन्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.