महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात पावसाने गेली चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील सुमारे चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून हे नुकसान अधिक वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची पिके आणि त्यांचे झालेले नुकसान यांची भरपाई करण्याची करण्याचा अधिकार पूर्णतः जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे शेतकऱ्यांचे मत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला, पण नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अगदी अल्प प्रमाणात मिळाली . तर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळाली नाही. यावर्षी अशा पद्धतीचे शेतकऱ्यांचे हाल होऊ नये अशी संपूर्ण शेतकरी बांधवांकडून अपेक्षा आहे.
