Kolhapur News-कोल्हापुरातील मल्हारपेठ येथे भिंत कोसळली, पाच जण भिंतीखाली अडकले गावकऱ्यांनी केले शर्थीचे प्रयत्न

कोल्हापूर जवळच असलेल्या मल्हारपेठ येथे भिंत कोसळून पाच जण भिंतीखाली गाडले गेले.रंगराव दत्तू मोरे आणि त्याच घरातील चौघेजण असे एकाच कुटुंबातील पाच जण या भिंतीखाली गाढल्यामुळे गावकऱ्यांनी रंगराव दत्तू मोरे यांच्या घराकडे धाव घेतली. ही बातमी बघता बघता पोलिसांनाही समजली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पाऊस धो धो पडत होता. गावकऱ्यांचे मदतकार्य चालूच राहिले होते.अखेर गावकऱ्यांनी संपूर्ण ढिकारा बाजूला केला आणि भिंतीखाली दबलेल्या पाचही जणांना बाहेर काढले आणि तातडीने सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे ऍडमिट केले. जखमींवर सीपीआर हॉस्पिटल येथे उपचार चालू असून पाचही जणांची प्रकृती सुधारत आहे. गावकऱ्यांनी वेळीच दाखवलेल्या धाडसाबद्दल आणि मदत कार्याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे.

Leave a comment