Radhanagari News-राधानगरी तालुक्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ दूधगंगा धरणातून 25000 क्युसेक पाणी सोडले सुळंबीचा पूल पाण्याखाली पहा व्हिडिओ

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातलेला आहे. उच्चांकी पावसामुळे राधानगरी धरणाचे सातहीस्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत. त्याचबरोबर दूधगंगा धरणातूनही 25000 क्युसेक पाणी सोडलेले आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच पाणी सोडलेले नव्हते. त्यामुळे सावर्डे-सुळंबी मार्गावर असलेल्या सुळंबीजवळील उंच पुलावरसुद्धा एक ते दीड फूट पाणी आलेले आहे. पुलाची स्थापना झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने सुळंबीजवळील पूल पाण्याखाली गेल्याची घटना घडलेली आहे. हे पूल पाण्याखाली गेलेला व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा.

Leave a comment