भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतर्फे सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी आहे. तर इंडिया आघाडीतर्फे बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी आहे. या दोन उमेदवारांमध्येच समोरासमोर टक्कर आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? पक्षीय बलाबल काय आहे? कोण जिंकेल याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया
उपराष्ट्रपदाची निवडणूक दर पाच वर्षांनी होते. पण जगदीश धनकड यांनी राजीनामा दिल्याने मध्यावधी निवडणूक प्रक्रिया सध्या चालू झाली आहे.
उपराष्ट्रपती पदाचे निवडणुकीसाठी ती व्यक्ती भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीवर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नसावा. कायद्याचा अभ्यास असावा. भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास असावा.
उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर लोकसभेतील सर्व खासदार आणि राज्यसभेतील सर्व खासदार उपराष्ट्रपती पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान करतात. हे मतदान करताना पक्षाचा व्हीप लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या खासदारांना लागू होत नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहातील खासदार आपल्या मताप्रमाणे उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करतात सध्या इंडिया आघाडीने सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या विरुद्ध इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी घेत घोषित केली आहे. दक्षिणेतील मतांवर डोळा ठेवून एनडीए आघाडीने सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी घोषित केली आहे;पण इंडिया आघाडीने इंडिया आपली उमेदवारी घोषित करताना दक्षिणेतीलच उमेदवार निवडलेला आहे. त्याचबरोबर या उमेदवाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा उमेदवार आंध्र प्रदेशचा आहे. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसमदेसमचे हातात16 खासदार आहेत. त्याचबरोबर राज्यसभेचे सदस्य सुद्धा आहेत. एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी यांचे लोकसभेतील आणि राज्यसभेतील पक्षीय बलाबल पाहता सुमारे 25 ते 30 मतदान एनडीए आघाडीचे फुटले तर विरोधी आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. सध्या एनडीए आघाडीकडे लोकसभेत 293 खासदार आहेत. तर इंडिया आघाडीकडे 234 खासदार आहेत. राज्यसभेचे पक्षीय बलाबल पाहता एनडीए आघाडीकडे 117 खासदार आहेत तर इंडिया आघाडीकडे 123 खासदार आहेत. दाक्षिणात्य उमेदवार दोन्हीही असल्यामुळे मतांची वैयक्तिक मतांची विभागणी ज्या उमेदवारावर होईल तो उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे. असे असले तरी सध्या एनडीए आघाडीकडे बहुमत आहे.पण एनडीए आघाडीबाबत संपूर्ण देशात दूषित वातावरण झालेले आहे. मत चोरी हा मुद्दा कळीचा बनलेला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघातील सविस्तर मतचोरीचा इतिहास मांडला होता. राहूल गांधी यांनी मांडलेले मुद्दे निवडणूक आयोगाला खोडता आले नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीने आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मतचोरी केली असल्याच्या मुद्दा लोकांना पटलेला आहे. हे सर्वमान्य आहे.इडी सीबीआय यांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्वच खासदार, मंत्री,विरोधी आघाडीचे सर्वच नेते त्रस्त झालेले आहेत.भारतीय जनता पक्षात सुद्धा धुसफूस आहे.ही धुसफूस खासदारांनी गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे व्यक्त केल्यास निश्चितच इंडिया आघाडीचा ह्या निवडणुकीत विजय होईल आणि हा विजय लोकशाहीचा खूप मोठा विजय असेल.
9 सप्टेंबर 2025 रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. बघूया कोण उमेदवार बाजी मारत होते. घोडा मैदान जवळच आहे.