उज्जयी प्राणायाम मन आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे प्राणायाम आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील मज्जासंस्थेचे कार्य उत्तम प्रकारे चालण्यास मदत होते. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी उज्जैयी प्राणायाम खूप फायदेशीर ठरतो. आपली विश्रांती वाढवणे, तणाव चिंता कमी करणे, निद्रानाश दूर करणे, फुफुसांची क्षमता वाढवणे, रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित चालणे, डायफ्रामला बळकटी देणे, थायरॉईडचे नियंत्रण करणे,शरीरांतर्गत उष्णता वाढवणे, विषारी पदार्थ काढून टाकणे इत्यादी अनेक फायदे उज्जैयी प्राणायामचे आहेत. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ.
मानसिक आणि भावनिक फायदे
उज्जैयी प्राणायाममुळे मन शांत राहते.
उज्जैयी श्वासाचा फायदा मन शांत ठेवण्यास होतो. श्वासाचा समुद्रासारखा आवाज मज्जा संस्थेला शांत करतो.शरीरातील अस्वस्थता शांत करतो. शरीर शांत राहते. स्वस्थ राहते. मानसिक अस्वस्थता कमी होते आणि आंतरिक शांतता वाढते.
हृदयाशी संबंधित आजार दूर होतात
उज्जयी प्राणायाम आपल्या श्वासोस्वासावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी उज्जैयी प्राणायाम खूप फायदेशीर आहे. उज्जैयी प्राणायाममुळे उच्च रक्तदाब कमी होतो . आपला रक्तदाब स्थिर राहण्यास मदत होते. हृदयाचे काम शांततेत आणि स्थिरतेने चाल चालते.
पचन आणि विषमुक्ती करण्यास मदत होते
उज्जैयी प्राणायामच्या नियमित सरावाने आपल्या पचन संस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा होते. याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम उत्तम प्रकारे होते. आपल्या शरीरांतर्गत कफ कमी होतो. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज हळूहळू कमी होतात आणि रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
थायरॉइडचे कार्य नियंत्रित करते
उज्जयी प्राणायामच्या नियमित सरावाने घशाच्या भागाला उत्तेजित करण्याचे काम चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे थायरॉईड आणि पॅराथायरॉइड ग्रंथींचे कार्य नियमित करण्यास मदत होते. थायरॉइडच्या सर्व प्रकारच्या आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी उज्जयी प्राणायाम नियमित करावा.
शरीरांतर्गत उष्णता वाढवते
उज्जैयी प्राणायामचा नियमित सरावाने शरीरांतर्गत उष्णता वाढते. आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील विषारी घटकांना शरीराच्या बाहेर फेकण्याचे काम उत्तम प्रकारे होते. शरीरांतर्गत उष्णता वाढल्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य उत्तम प्रकारे चालते.
तग धरण्याची क्षमता व संयम क्षमता वाढते
उज्जैयी प्राणायामचे अनेक फायदे आहेत. त्यातील हा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली क्षमता वाढते. शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता वाढते .एखाद्या कामाच्या वेळी तग धरण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर संयम वाढतो. त्यामुळे हृदयाचे कार्य व्यवस्थित चालते. उच्च रक्तदाबापासून आपल्याला मुक्ती मिळते.
मनाची एकाग्रता वाढते
उज्जैयी प्राणायाममुळे मनाची एकाग्रता वाढते. एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी उज्जैयी प्राणायाम खूप मदत करतो.
निद्रानाश दूर होतो
अलीकडे ताणतणाव आणि धावपळ यामुळे अनेकांना निद्रानाशाची समस्या भेडसावते. अशा लोकांनी नियमित उज्जयी प्राणायाम केल्यास आपल्या श्वासावर नियंत्रण राहते श्वासोच्छ्वास शांत राहतो. त्यामुळे निद्रानाश नष्ट होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.
श्वसन प्रक्रियेत सुधारणा होते
उज्जैयी प्राणायाममुळे श्वासनलिकेची क्षमता वाढते. श्वसन प्रक्रियेमध्ये लाक्षणिक सुधारणा होते. फुफुसांची कार्यक्षमता वाढते. शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो. त्यामुळे रक्ताभिसरण क्रियाही व्यवस्थित होते.