कबूतरखान्याचा विषय संपवून आता सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यामुळे जे विपरित परिणाम होतात, त्याचे दुष्परिणाम अनेक माणसांना भोगावे लागतात. त्या अनुषंगाने 11 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तो निर्णय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
हा आदेश देशभर लागू होणार
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. त्याला आळा बसावा आणि मोकाट कुत्री एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमू नयेत आणि मानवावर हल्ले होऊ नये या उद्देशाने न्यायमूर्ती विक्रम नाथांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संदीप मेहता, न्यायमूर्ती अंजारिया यांच्या खंडपीठाने आता या प्रकरणाची व्याप्ती दिल्ली आणि दिल्लीच्या बाहेर वाढवली असून संपूर्ण देशभर हा कायदा लागू होईल आणि कोणीही मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घातल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
निकालानंतर पशुप्रेमी यांच्यात आनंद
मोकाट कुत्र्यांना दिल्ली सरकारने पकडून सेल्टर होममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांना डांबून ठेवण्याबाबत नाराजी व्यक्त केली असून त्यांना सोडा, पण लसीकरण करून सोडा आणि नसबंदी करून सोडा असे हे सुनावले आहे. त्यामुळे पशुप्रेमींना मोकाट कुत्र्यांची बंदी उठवल्याबद्दल आनंद झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाना घातल्यास कठोर कारवाई
अलीकडे शहरांमध्ये एक नवीन पद्धत रूढ झाली आहे आणि ती पद्धत म्हणजे भटक्या व मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्याची पद्धत होय. एका विशिष्ट ठिकाणी शहरातील काही मंडळी येतात आणि दररोज त्यांना खाऊ घालतात. त्यामुळे त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा म्हणजेच मोकाट कुत्र्यांचा एक जमाव तयार होतो. तेथेच तो जमाव कायम राहतो.कारण त्यांना माहिती असते की या ठिकाणी आपल्याला आयता खाऊ मिळतो. पण याचा दुष्परिणाम असा होतो की एखाद्या वेळी त्यांना खाना मिळाला नाही तर तेथील लोकांवर, लहान मुलांवर हीच कुत्री हल्ला करू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने मोकाट कुत्र्यांना कोणी खाना घालत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.