पार्वतीपुत्र गणेश हा एका गणाचा (छोट्या राज्याचा) राजा होता.तो एक उत्तम प्रशासक,कीर्तिमान, न्यायी आणि बुद्धिमान राजा होता. शिवायतो लोकप्रिय होता.म्हणूनच त्याची पूजा, उत्सव करतात.चंद्रगुप्त मौर्य याने एका वेळी दुष्ट धनानंद आणि सेल्यूकस या दोन बलाढ्य सत्तांचा पराभव करून त्याने एका नवीन गणाचा राजा बनून न्यायाचे राज्य स्थापन केले.त्यालाही म्हणूनच गणपती बाप्पा मौर्या म्हणून उद्घोषण करतात. अष्टविनायक हे तर बुद्धाचे अष्टांग मार्ग मानले जातात.. गणपतीला दु:खहर्ता म्हणतात.बुद्धानेच दुःखाचे निवारण करण्याचे मार्ग शोधले. आपण नेमके कोणत्या गणपतीचा उत्सव करतो. हे निश्चित सांगता येत नाही.तरी सुद्धा परंपरा म्हणून गणेश चतुर्थी साजरी करतो.
