सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रम साजरे करताना डीजेचा सर्रास वापर वाढला आहे; पण या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. अनेकांच्या अवयवांवर परिणाम होत आहे. वृद्ध, लहान बालके यांच्यावरही मोठ्या प्रमाणात आघात होत आहे. खरंच अशा उत्सवाच्या वेळी किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी डीजे वापरावा का ? आणि वापरला तर तो किती डेसिबल पर्यंत वापरावा? याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती…
डीजे म्हणजे काय?
डीजे म्हणजेच डिस्क जॉकी या डीजेमुळे तरुणांचे आयुष्य बरबाद होत आहे. धार्मिक सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम यासाठी डीजेचा वापर सर्रास होत आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक उत्सवासाठी डीजेचा वापर करण्यास परवानगी दिली. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात कर्णकर्कश आवाज सुरू झाला. खरं तर मुख्यमंत्री हे सुज्ञ,शहाणे शिकलेले आणि वैचारिक बैठक असलेल्या असावेत. अशा मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार की जे डीजेला परवानगी देत आहेत. या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. याला जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धरायचे का? तरुणाई बिघडवण्याचे काम अशा परवानगीने होत आहे, याची काहीही तमा न बाळगता परवानगी दिलेली आहे.
डीजेचा आवाज किती डेसिबल असावा?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजेचा आवाज दिवसा 55 डेसिबल पेक्षा जास्त असू नये. तर रात्रीच्या वेळी 45 डेसिबलपेक्षा जास्त असू नये .कारखानदारी किंवा गजबजलेल्या ठिकाणी तो आणखी दहा डेसिबल पेक्षा जास्त असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.डीजेचा आवाज 55 डेसिबलपेक्षा जास्त वाढला तर त्याचा परिणाम हृदयातील रक्तवाहिण्या फुटण्याच्या शक्यता असतात.म्हणूनच डीजेचा आवाज 55 डेसिबलपेक्षा जास्त असू नये. सध्या गणेशोत्सव, कृष्णजन्माष्टमी किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी डीजेचा आवाज इतका वाढलेला असतो की तो शंभर ते दीडशे डेसिबल पर्यंत असतो. कधी कधी त्याहीपेक्षा अधिक वाढलेला असतो. अशा डेसिबलमुळे निश्चितपणे माणसाचे हृदय फुटते आणि मृत्यू होऊ शकतो.