महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा वादळ उठले आहे. मराठा आरक्षणाची आर या पार लढाई करणारे आणि त्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने मुंबईच्या दिशेने लाखो लोकांचा मराठा आरक्षणासाठी जमाव तयार होत आहे.
न्यायालयाने एक दिवसासाठी बंदी उठवली
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे प्रचंड लोक मोठ्या संख्येने मराठा लोक एकत्र जमू नयेत म्हणून राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. त्याला न्यायालयाने हिरवा कंदील देऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यास बंदी घातली होती; पण मराठा समाजाच्या रेठ्यामुळे ही बंदी उठवली आणि एक दिवसासाठी मर्यादित आंदोलकांसह आंदोलन करण्यास परवानगी दिली.
मनोज जरांगे यांचे हमीपत्र आणि न्यायालयाची परवानगी
मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनास परवानगी नाकारल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांचे वकील दाखल झाले.त्यांनी हमीपत्र देऊन मुंबई उच्च न्यायालयाची एक दिवसासाठी परवानगी दिली. या हमीपत्र मनोज जरांगे पाटील यांनी 5000 लोकांपेक्षा जास्त लोक आझाद मैदानात जमा करणार नाही याची हमीपत्र दिले. तसेच कमीत कमी वाहने घेऊन आझाद मैदानात जाण्याचेही त्यांनी हमीपत्र दिलेले आहे. त्यामुळेच उच्च न्यायालयाने परवानगी देण्याचे मान्य केले आहे. तरी सुद्धा मराठा आंदोलकांचे तीव्रता वाढू नये म्हणूनच महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक आंदोलनात चेपण्याचा प्रयत्न केला होता.