Tariff impact on jobs-टॅरिफचा फटका: 20 लाख नोकऱ्यांना धोका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 55 ते 66% टॅरिफ लावल्यामुळे वीस लाख नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. काय आहे बातमी सविस्तर पाहू.

भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी: करते त्याचा फटका?

भारत अमेरिकेत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करते. ही खरेदी भारताने करू नये, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते; पण भारताने ही गोष्ट जुमानली नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% हून अधिक टॅरिफ कर आकारला.त्याचा फटका म्हणून आता वीस लाख नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नायरा कंपनी आणि अदानी यांचा फायदा..?

नायरा की अदानीशी संबंधित कंपनी असून या कंपनीमार्फत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. आणि मग हे तेल रिफाईन करून भारताला विकले जाते. भारत सरकार आपल्याला हवे तेवढे तेल घेऊन बाकीचे तेल परदेशात विकते. हे जरी खरे असले तरी रशियाकडून घेतल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचा फायदा नायरा कंपनीलाच अधिक होत आहे. हीच खरेदी जर भारत सरकारने स्वबळावर केली असती तर भारत सरकारला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला असता आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत झाली असती.

टॅरिफमुळे भारताला सव्वा दोन लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असे दिसते. त्यामुळे विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात भारत सरकारवर आणि मोदींच्या निर्णयावर टीका केली आहे.

Leave a comment