सोशल मीडियावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलन केले होते. ते आंदोलन चिरडण्यासाठी नेपाळ सरकारने गोळीबार केला होता. त्यात वीस तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण नेपाळमध्ये असंतोषाची लहर उठली होती .नेपाळच्या प्रमुख नेत्यांवरच हल्ले झाले. यात नेपाळचे माजी पंतप्रधान यांच्या पत्नीचाही जाळपोळीत मृत्यू झाला.
