भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे योग. “योग” हा शब्द संस्कृतमधून आला असून त्याचा अर्थ आहे – जोडणे किंवा एकरूप होणे. शरीर आणि मन, आत्मा आणि परमात्मा, विचार आणि कृती यांचे परिपूर्ण मिलन म्हणजे योग.
आजच्या धावपळीच्या युगात योगाचे महत्त्व आणखी वाढले आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती या तिन्हींचा संगम योगातून साध्य होतो.
योग म्हणजे काय? (What is Yoga?)
योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर जीवन जगण्याची एक संपूर्ण पद्धत आहे. पतंजलींनी योगसूत्रामध्ये सांगितलेले “योगश्चित्तवृत्तिनिरोधः” हे वचन योगाचे सार सांगते. म्हणजेच – मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवणे म्हणजे योग.
योगाचे आठ प्रकार – अष्टांग योग (Eight Limbs of Yoga)
पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगामध्ये आठ पायऱ्या आहेत. या आठ पायऱ्या म्हणजे साधकाला हळूहळू आत्मसाक्षात्काराकडे नेणारा मार्ग आहे.
१) यम (Yama) – सामाजिक शिस्त
यम म्हणजे समाजाशी वागण्याचे नियम.
पोटप्रकार (Pancha Yama):
अहिंसा (Ahimsa) – कुणालाही दुखावू नये
सत्य (Satya) – सत्याचे आचरण करावे.
अस्तेय (Asteya) – चोरी न करणे.
ब्रह्मचर्य (Brahmacharya) – संयम ठेवणे.
अपरिग्रह (Aparigraha) – लोभ न ठेवणे
२) नियम (Niyama) – वैयक्तिक शिस्त
नियम म्हणजे स्वतःच्या जीवनातील आत्मशिस्त.
पोटप्रकार (Pancha Niyama):
शौच (Shaucha) – शरीर व मनाची स्वच्छता
संतोष (Santosha) – समाधान
तप (Tapa) – आत्मसंयम.
स्वाध्याय (Swadhyaya) – आत्मचिंतन
ईश्वर प्राणिधान (Ishwar Pranidhana) – परमेश्वरावर म्हणजे निसर्गावर विश्वास.
३) आसन (Asana) – शरीराची स्थिती
आसन म्हणजे शरीर स्थिर ठेवण्याची सुखद स्थिती. आसनांमुळे शरीर निरोगी, मजबूत व लवचिक राहते.
आसनांचे प्रमुख प्रकार:
1. ध्यानात्मक आसने – पद्मासन, सिद्धासन, सुखासन
2. शारीरिक आरोग्यवर्धक आसने – ताडासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन
3. उलटी आसने – शीर्षासन, सर्वांगासन
4. संतुलन आसने – वृक्षासन, गरुडासन
5. शिथिलीकरण आसने – शवासन, मकरासन
सूर्यनमस्कार (Surya Namaskar)
सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी आसनसंच म्हणजे सूर्यनमस्कार.
सूर्यनमस्कारात १२ क्रमिक स्थिती आहेत, ज्या शरीराला संपूर्ण व्यायाम देतात.
सूर्यनमस्कारातील 12 चरण:
1. प्रणामासन
2. हस्तउत्तानासन
3. पदहस्तासन
4. अश्वसंचलनासन
5. पर्वतासन
6. अष्टांग नमस्कार
7. भुजंगासन
8. पर्वतासन
9. अश्वसंचलनासन
10. पदहस्तासन
11. हस्तउत्तानासन
12. प्रणामासन.
सूर्यनमस्काराचे फायदे: benefits of Suryanamaskar
शरीरातील सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो.
रक्ताभिसरण सुधारते.
लठ्ठपणा कमी होतो.
पचनशक्ती वाढते.
मन प्रसन्न राहते.
४) प्राणायाम (Pranayama) – श्वसन नियंत्रण
श्वास हा जीवनाचा आधार आहे. प्राणायामाने श्वासोच्छ्वास नियंत्रित करून मन व शरीर स्थिर करता येते.
महत्त्वाचे प्राणायाम:
A अनुलोम-विलोम
B भ्रामरी
C कपालभाती
D भस्त्रिका
E उज्जायी
५) प्रत्याहार (Pratyahara) – इंद्रिय संयम
इंद्रियांची शक्ती बाहेरून आत वळवणे म्हणजे प्रत्याहार. यामुळे मन अंतर्मुख होते.
६) धारणा (Dharana) – एकाग्रता
मन एका बिंदूकडे स्थिर ठेवणे.
प्रकार: त्राटक, मंत्रजप, श्वसन-एकाग्रता वाढते.
७) ध्यान (Dhyana) – ध्यानधारणा
सातत्याने एकाग्रता राखणे म्हणजे ध्यान.
प्रकार: साक्षीभाव ध्यान, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान.
८) समाधी (Samadhi) – परम एकात्मता प्राप्त करता येते.
योगाचा अंतिम टप्पा म्हणजे समाधी.
प्रकार: सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी.
योगाचे शारीरिक फायदे (Physical Benefits of Yoga)
आपले शरीर लवचिक व सुडौल बनते.
आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.
चयापचय क्रिया सुधारते.
मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात राहतो.
आपली.झोप सुधारते.प्रत्येक माणसाला 6 ते 8 तास झोपेची गरज असते.
योगाचे मानसिक फायदे (Mental Benefits of Yoga)
तणाव व नैराश्य कमी होते.
आपली एकाग्रता वाढते.
आपल्याला आत्मविश्वास मिळतो.
आपली स्मरणशक्ती सुधारते.
योगाचे आध्यात्मिक फायदे (Spiritual Benefits of Yoga)
यागामुळे आत्मशुद्धी साध्य होते.
योगसाधनेमुळे अंतर्मुखता वाढते.आत्मा व परमात्म्यातील एकत्व साधता येते.मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो.
तात्पर्य
योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवणारा संपूर्ण विज्ञान आहे. अष्टांग योगाच्या आठ पायऱ्या, आसने, प्राणायाम, ध्यान आणि समाधी या टप्प्यांतून साधक निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवन जगतो.त्यासाठी सातत्यपूर्ण योगसाधना आवश्यक आहे.
आज जगभरात योगाला मिळालेला मान आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणे हे भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे द्योतक आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश करणे ही काळाची गरज आहे.