सर्वसाधारणपणे पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतात मोठा भूकंप घडेल.पंतप्रधान मराठी माणूस होईल. अशा प्रकारची विधाने केली होती. या पाठीमागे एपस्टीन फाईलच आहे. ही फाईल म्हणजे नेमके काय? कोणाकोणाच्या अनैतिक कारणाम्यांचे पुरावे यात आहेत ? याची सविस्तर माहिती या फाईलमध्ये आहे. त्यामुळे अनेक राजकीय सत्ताधाऱ्यांची काळी कारस्थाने या फाईलमध्ये लपलेली आहेत.म्हणूनच जगामध्ये हा एपस्टीन फाईलचा भूकंप खूप मोठा असणार आहे हे निश्चित…….
जेफ्री एपस्टीन कोण होता?*Who is Jeffrey Epstein?
जेफ्री एपस्टीन हा काही कोणी सुशिक्षित विचारवंत नव्हता. त्याने अशी कोणत्याही विद्यापीठाची पदवी सुद्धा घेतलेली नव्हती; पण तो कोट्यवधी डॉलर्सचा मालक होता. जगातील अनेक नामवंत राजकारणी लोक, उद्योगपती,पंतप्रधान यांना आपल्या जाळ्यात ओढण्यास तो यशस्वी झाला होता. जेफ्री एपस्टीन वेगवेगळ्या राजकारणी बड्या लोकांना विविध देशांच्या पंतप्रधानांना, राष्ट्राध्यक्षांना कोवळ्या मुली पुरवायचा. हा त्याचा उद्योग! आणि त्या सर्व गोष्टींचे पुरावे तो आपल्याजवळ ठेवायचा, जेणेकरून भविष्यात आपल्याला कोणताही धोका होऊ नये हा त्या पाठीमागील हेतू होता.
अमेरिकेतील संसदेचा कायदा आणि एपस्टीन फाईल
नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकन संसदेमध्ये फाईल संदर्भात चर्चा झाली .आणि अमेरिकन काँग्रेसने बहुमताने फाईल ही ओपन झाली पाहिजे अशी ठराव केला. त्या ठरावाचा परिणाम म्हणून 19 डिसेंबर 2025 रोजी एपस्टीन फाईल ओपन करण्याचे अमेरिकन संसदेमध्ये ठरले. त्यानुसार 19 डिसेंबर 2025 रोजी एपस्टीन फाईलमधले अगदी काही फोटो ओपन झालेले आहेत. यापुढे संपूर्ण फोटो म्हणजे साधारणपणे 75 हजार ते 90 फोटो ओपन होणार आहेत. जगातील अनेक सत्तांना या फोटोमध्ये हादरे बसणार आहेत.
लोलिता कादंबरी आणि एपस्टीन फाईल
लोलिता ही जगप्रसिद्ध कादंबरी 1955 मध्ये प्रसिद्ध झाली होती. ती जगातील प्रसिद्ध शंभर कादंबऱ्यांपैकी एक कादंबरी होती. या कादंबरीत एका बारा-तेरा वर्षांच्या कोवळ्या मुलीवर छत्तीस वर्षाचा प्राध्यापक फिदा झाला होता. असे कथानक या कादंबरीचे आहे.या कादंबरीतील कथानकाप्रमाणेच पुढे जेफ्री एपस्टीन याने एक व्यवसाय चालू केला.जगातील वेगवेगळ्या देशातील सुंदर मुलींना जाळ्यात ओढवून त्यांना पैशाचे आमिष दाखवले . जगातील नामांकित व्यक्तींना या मुली पुरवण्याचे काम तो करू लागला. यातूनच ही एपस्टीन फाईल गाजू लागली.
एपस्टीन फाईलमध्ये काय घडले आहे?
एपस्टीन फाईलमध्ये जगातील नामवंत राजकारण्यांचे, उद्योगपतींचे कारणामे लपलेले आहेत.या फाईलमध्ये सुमारे 75 हजार ते 90 हजार फोटो, व्हिडिओज ,क्लिप्स आहेत. या हे सर्व फोटो जेव्हा अमेरिकन संसदेमध्ये प्रसिद्ध होतील, तेव्हा जगामध्ये एकच आहाकार उडेल.अनेक सत्ता पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे कोसळतील. या भूकंपाचा धक्का भारतापर्यंतही येईल. भारतातही काही नामवंत राजकारणी या एपस्टीन फाईलमध्ये अडकलेले आहेत .वरवर दिसणारे हे साधू एपस्टीन फाईलच्या माध्यमातून आज उघडेनागडे होतील आणि जगासमोर यांचे खरे चेहरे येतील. अमेरिकन संसदेमध्ये अशा प्रकारचा कायदा होतो हे अमेरिकेचे खास वैशिष्ट्य मानले पाहिजे. भारतासारख्या देशात अशी कितीतरी कृष्णकारस्थाने दडपली जात आहेत आणि गुन्हेगार सोडून निष्पाप लोकांना पकडून तुरुंगात टाकले जात आहे.फाईल पूर्ण ओपन होईल आणि सारे फोटो जेव्हा जगासमोर येतील, त्यावेळी निश्चितच त्यात भारत असेल. भारतातील बडे नेतेही असतील. हे कोण कोण नेते असतील याची माहिती सविस्तर लवकरच संपूर्ण जगाला कळेल. हे सत्य उघड झालेच पाहिजे आणि राजकारण्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला पाहिजे.