महाराष्ट्रात नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. सत्ता आणि पैशाच्या बळाचा वापर करून महायुतीने महाराष्ट्रात सुमारे 207 नगरपालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. यातील 117 भाजपा, 53 शिंदेसेना आणि 37 अजित पवार गट .तर महाविकास आघाडीला केवळ 44 नगरपरिषदांमध्ये विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्राच्या निकालाकडे पाहिले असता लोक सत्तेच्या मागे धावत आहेत की काय की सत्ता बळाचा वापर करून निवडणुका जिंकते हेच समजेनासे झाले आहे.