Poverty in Developed Countries-प्रगत राष्ट्रांनाही गरिबीचा शाप

अमेरिका,जपानसह अनेक राष्ट्रात गरिबीची टक्केवारी फारशी कमी झालेली नाही.अर्थात वेगवेगळ्या देशात गरिबी ठरवण्याच्या कसोट्या वेगवेगळ्या आहेत, हे प्रथम मान्य करावे लागेल. जपानमधील किंवा ब्राझील मधील आणि अमेरिकेतीलही गरीब माणूस आणि भारतातील गरीब माणूस यांची तुलना करता जपान मधील गरीब माणूस हा भारतात श्रीमंत ठरू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या देशात गरिबी ठरवण्याची कसोटी वेगवेगळी आहे, हे मान्य करून आपण काही ठराविक लोकांचे देशांची गरिबीची टक्केवारी पाहणार आहोत. जपानच्या गरीब ठरवण्याच्या कसोट्या भारताने वापरल्या, तर भारतात 70 टक्के लोक गरीब निघतील.

देश आणि गरिबी

दक्षिण आफ्रिका:64%

ब्राझील:62%

फ्रान्स: 41%

भारत:39%

अमेरिका :35%

जर्मनी : 31%

जपान: 26%

चीन: 12%

चीन या देशाची प्रचंड लोकसंख्या आणि तेथील गरिबीची टक्केवारी पाहिली असता चीन या देशाने खूप प्रगती केली आहे, असे आकडेवारीतून दिसत असले तरी अमेरिकेतील गरिबीची टक्केवारी आणि चीनची गरिबीची टक्केवारी ठरवण्याची कसोटी वेगवेगळी आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. असे असले तरी ज्या त्या देशाच्या गरिबी ठरवण्याच्या कसोटीनुसार प्रत्येक देशाला गरिबी हा शाप लागलेला आहे आणि तो कमी झालेला नाही हे बाब मान्य करावी लागेल.

प्रचंड विस्तार असलेला दक्षिण आफ्रिका हा देश कुपोषण आणि गरिबी या प्रश्नातून आजही मुक्त झालेला नाही, हे बोलक्या आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत काळे आणि गोरे ही सामाजिक विषमता आजही कमी झालेली दिसत नाही.

Leave a comment