Gold and silver record high-2025 सालात सोन्या चांदीची उच्चांकी भरारी

2025 सालात सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंनी उच्चांकी भरारी घेतली असून सोन्याच्या दरात सुमारे 62 हजार रुपये वाढले, तर चांदीच्या दरात 1 लाख 46 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

2024 साली दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 162 रुपये होता. तो आता वाढून 1 लाख 38 हजार 300 रुपयांवर गेलेला आहे. तर याच काळात चांदीचा दर 86 हजार रुपये किलो होता.त्यामध्ये 1 लाख 46 हजार 83 रुपयांची वाढ होऊन सध्या चांदी 2 लाख 38 हजार 300 रुपये प्रति किलो झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी यांची वाढ यापूर्वी कधीच झाली नव्हती. त्यामुळे सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना जणू लॉटरीच लागली आहे. त्यांना कमालीचा फायदा झाला असून गुंतवणूकदार खूप खुश आहेत.

Leave a comment