Maharashtra cold wave 2026-महाराष्ट्रात 2026 चे स्वागत कडाक्याच्या थंडीनेच होणार

चालू वर्षी डिसेंबर महिन्यात चांगलेच थंडीने सर्वांना गारठून सोडले आहे. कडाक्याची थंडी आणि गार वाऱ्यामुळे अनेक लोकांना सर्दी, पडसे, खोकला इत्यादी आजार झाले आहेत आणि लोक आजाराबरोबरच थंडीनेही त्रस्त झाले आहेत. सध्या थंडीचे प्रमाण थोडे कमी असले तरी उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच करावे लागणार असे वाटत आहे.

सध्या महाराष्ट्रातील जेऊर येथे 8.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले आहे. तर मालेगाव येथे 9.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले आहे. सातारा येथे 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदले आहे. त्यामानाने महाबळेश्वर येथे 11. 7 अंश सेल्सिअस तापमान नोंदलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अगदी कानाकोपऱ्यात पाहिले तर इतके तापमान प्रथमच कमी होत असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रीयन लोकांना थंड हवा सहन होत नाही. त्यामुळे कडक थंडीमुळे महाराष्ट्रातील लोक बेजार झाले आहेत; पण आपल्याला नवीन वर्षातील किमान एक महिना तरी म्हणजे जानेवारी 2026 हा महिना कडक थंडीत जाणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अजूनही ज्यांनी उबदार कपडे खरेदी केली नसतील तर ती कपडे खरेदी करायला हरकत नाही अशी स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.

Leave a comment