जगाच्या पाठीवर अमेरिका खालोखाल चीनने सर्वच क्षेत्रात प्रगतीचा धडाका लावलेला आहे. सध्या चीनमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा म्हणजे सुमारे 22.13 किमीचा बोगदा प्रवासासाठी खुला झालेला आहे.हा बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे 20 मिनिटात हा बोगदा पार करता येईल, असा चेंज सरकारचा दावा आहे. चीनने शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी 22.13 किमी लांबीचा बोगदा वाहतुकीसाठी खुला केला असून जगातील सर्वात लांब आणि द्रुतगती मार्ग बोगदा असल्याचा चीनचा दावा आहे.
या बोगद्यात सर्वात खोल व्हर्टिकल शाफ्ट बांधण्यात आला आहे. हा बोगदा सुमारे अडीच हजार किलोमीटर पर्यंत पसरलेल्या मध्य तियांशान पर्वत रांगांमधून जात असून या बोगद्याचे नाव तियानशान शेंगली असे आहे. या बोगद्याने कित्येक तासांचा वळणावळणांचा आणि धोकादायक प्रवास आता केवळ 20 मिनिटांत पूर्ण होईल असा चीन सरकारने धावा केला आहे. हा द्रुतगती मार्ग 324.7 किलोमीटर अंतरात लांबीचा असून त्यासाठी 6.63 अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे. हा द्रुतगती मार्ग उत्तर आणि दक्षिण शिन जियान मधील शहराला जोडणारा एक मुख्य वाहतूक वाहिनी म्हणून काम करणार आहे.