Ajit Pawar-अजित दादा गेले; पण अपघात की घातपात?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, सर्वांचे लाडके, स्पष्टवक्ते, मनमिळाऊ, मिश्किल आणि परखड व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित दादांचा बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळावर ठीक 8 वाजून 48 मिनिटांनी विमान लँडिंग होण्यापूर्वी धावपट्टीच्या बाहेर असतानाच अपघात होऊन विमानाचा प्रचंड स्पोर्ट झाला आणि त्यामध्ये दादांसह आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबाबत अनेक तज्ज्ञांनी आणि जाणकारांनी अपघात की घातपात ?असा प्रश्न विचारला आहे. डिजिटल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात संशयाचा वादळ उठले आहे.विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासल्यानंतर त्यामध्ये सुद्धा काही संशयास्पद माहिती हाती आली आहे. त्यामुळे दादांच्या मृत्यूबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपूर्ण देशभरातून अजित दादांना श्रद्धांजली

अजित दादांच्या अपघाताची बातमी मीडियाद्वारे समजतात देशातील अनेक राजकीय, सामाजिक नेत्यांनी अजित दादांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचे पंतप्रधान, गृहमंत्री विरोधी पक्षनेते राहुल गांधी, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री यासह महाराष्ट्रातील अनेक जाणकार नेत्यांनी अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पण त्यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील राजकारणात, अर्थकारणात आणि समाजकारणात निर्माण झालेली तूट भरून निघण्यासारखी नाही.

शरद पवार प्रथमच भावूक

आपल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकीय व अन्य संकट आले तरी ते परतवून लावण्याचे आणि पचवण्याची प्रचंड शक्ती आणि उर्मी असलेले शरद पवार अजित दादांच्या मृत्यूने मात्र अखंड आयुष्यात प्रथमच भावूक झाल्याचे दिसून आले. मीडियावर मुलाखती द्वारे बोलताना त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. आवाजात बदल झाला होता. त्यांनी अजितच्या जाण्याने महाराष्ट्राचे आणि आपल्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचे आपल्या भावनेतून बोलून दाखवले.

अजित दादांची अष्टपैलू कामगिरी

1) दादांची दादागिरी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादांनी आपल्या कारकिर्दीमध्ये प्रशासनावर प्रचंड पकड निर्माण करून, प्रसंगी हुकूमत गाजवून एक प्रकारची दादागिरी करूनच जनतेची कामे करून घेतलेली आहेत. म्हणूनच त्यांचे प्रशासनावर प्रचंड वचक आणि वजन होते. या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांची पटापट काम करण्याची पद्धत लोकांना भावत असे.

2) निर्भीडपणा आणि परखडपणा

अजित दादांनी भाषणात असो किंवा काम करण्याच्या पद्धतीत असो आपला निर्भीडपणा आणि परखडपणा कधीही सोडला नाही. एवढेच नव्हे तर आपण बोलताना त्याचे परिणाम काय होतील याचाही कधी त्यांनी विचार केला नाही. आपल्या स्वभावाला कधीच लगाम घातला नाही. त्यांच्या या स्पष्ट वक्त्यामुळेच त्यांच्यावर अनेक लोक भरभरून प्रेम करायचे.

अजित दादा शब्दांचे आणि वेळेचे पक्के

अजितदादांचा दरबार म्हणजे एखाद्या राजाचा दरबार असायचा. या दरबारामध्ये अनेक लोकांचे प्रश्न दादा ऐकून घ्यायचे आणि त्याचा निपटारा त्याच ठिकाणी करायचे. या दरबारामध्ये काही प्रशासन अधिकाऱ्यांनाही ते बोलावून घेत आणि काही चुका झाल्यास तेथेच त्यांना झापत असत. लोकांचे काम वेळेवर करण्यासाठी ते अधिकाऱ्यांना तंबी देत असत. त्यांचा अगदी सकाळी सात वाजल्यापासून दरबार सुरू झाला की लोकांचे प्रश्न सुटेपर्यंत त्यांचा दरबार चालू असायचा. कामाची प्रचंड उरख आणि शब्दाचे पक्केपणा हा त्यांचा खास गुण असायचा. दादांकडे गेले की काम होणारच असा लोकांचा विश्वास होता. त्यामुळे समाजात ते लोकप्रिय मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध होते.

स्वच्छता आणि टापटीप पणातही दादा अव्वल

दादा स्वच्छतेच्या बाबतीत खूप काळजी घेत असत. नेहमी टापटीप येणे हे त्यांच्या शैलीचे एक खास वैशिष्ट्य होते. आपले कोणी साथीदार गबाळ्यासारखे आले तर ते त्यांना तेथेच खडसवायचे आणि स्वच्छतेचे धडे द्यायचे.

दादांचा अपघाती मृत्यू ही घातपात? यावर मात्र प्रश्नचिन्ह

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, सर्वांचे लाडके, स्पष्टवक्ते, मनमिळाऊ, मिश्किल आणि परखड व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित दादांचा बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळावर ठीक 8 वाजून 48 मिनिटांनी विमान लँडिंग होण्यापूर्वी धावपट्टीच्या बाहेर असतानाच अपघात होऊन विमानाचा प्रचंड स्पोर्ट झाला आणि त्यामध्ये दादांसह आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबाबत अनेक तज्ज्ञांनी आणि जाणकारांनी अपघात की घातपात ?असा प्रश्न विचारला आहे. डिजिटल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात संशयाचा वादळ उठले आहे.विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासल्यानंतर सत्य काय ते लवकरच समजेल. पण या ब्लॅक बॉक्सची तपासणी ही नि:पक्षपातीपणे व्हावी हीच अपेक्षा आहे.

Leave a comment