अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपल्या मर्जीनुसार भारत अमेरिका करार केला आहे. असे या करारावरून स्पष्ट दिसत आहे अमेरिकेने भारतावर 25% वरून 18 टक्क्यांवर टॅरिफ आणला. हे जरी खरे असले तरी अमेरिकेतील वस्तू भारतात विकताना त्यावर शून्य टक्के टॅरिफ आकारला जाणार. असा करार केला. खरे तर अमेरिकन वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात चालना मिळणार, पण त्याचा फायदा भारत सरकारला काहीही होणार नाही, तर त्याचा फायदा अमेरिका सरकारला होणार.
*भारत अमेरिका करारावरुन संसदेत गोंधळ*
नुकताच झालेल्या भारत अमेरिका करारावरून संसदेत प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अमेरिकेने आपला टॅरिफ कर 25 टक्क्यावरून अठरा टक्क्यांवर आणला असला तरी भारताने मात्र अमेरिकन मालावर 0% टॅरिफ आकारून अमेरिकेला संधीच दिली आहे. हा करार एकतर्फीच असून अमेरिकेचा पूर्णतः फायदा आहे. याशिवाय अनेक गुप्तगूही ठरले असण्याची शक्यता आहे. कारण रशियाकडून तेल विकत न घेता व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडून तेल घ्यावे असे अमेरिकेचा हट्टाग्रह आहे. आणि त्यामुळे स्वस्त दरात मिळणारे तेल आपल्याला अमेरिकेकडून महागात मिळणार आहे. ही बाब सर्वसामान्य जनतेला समजणे गरजेचे आहे. म्हणूनच संसदेत या भारत अमेरिका करारावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. हा करार पूर्णतः फसवा असून भारताला या कराराचा फायदा काहीच नाही. उलट अमेरिकेने भारताला या करारावरून नमवले आहे असेच चित्र दिसत आहे.