अनेक प्रगत देशांमध्ये लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात येत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर मोठे परिणाम होतात. आणि त्यामुळे त्यांना इतर काही सुचत नाही. अशी स्थिती निर्माण होते. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील धक्कादायक घटना अशीच घडली. बुधवारी( दिनांक 4 फेब्रुवारी2026) पहाटे एका इमारतीत नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून तीन अल्पवयीन बहिणींनी पालकांनी मोबाईल वापरावर बंदी घातल्याने उड्या मारून आत्महत्या केली .खरे तर ही घटना दुर्दैवाची असली तरी सर्व भारतीयांनी आणि विशेषतः भारत सरकारने या घटनेकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण लहान मुलं आणि मोबाईलचा वापर यांचे प्रमाण सध्या वाढत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील या तीन मुली म्हणजेच निशिका, प्राची, पाखी. त्यांची वये अनुक्रमे 16 ,14 ,12 अशी आहेत. अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून पालकांनी आता वेळीच सावध व्हावे.