19 वर्षाखालील भारतीय युवा क्रिकेट खेळाडूंनी हरारे येथे शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून षटकार ठोकला. भारताने हे विजेतेपद सहाव्यांदा मिळवले. यापूर्वी मोहम्मद कैफ( 2000)विराट कोहली( 2008),उन्मुक्त चंद (2012), पृथ्वी शॉ (2018) यश धूल (2022 )यांच्या नेतृत्वात भारताने विश्वविजेता हा मान पटकावला होता.
वैभव सूर्यवंशी ची अतुलनीय कामगिरी
भारताचा चौदा वर्षाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने 19 वर्षाखालील एक दिवशीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत 175 धावा ठोकून विक्रम केला. त्याने या मालिकेत एकूण 439 धावा आणि एक बळी घेतला. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर आणि मालिकावीर हा किताब मिळाला. वैभव सूर्यवंशी याने असाच परफॉर्मन्स ठेवल्यास भविष्यात क्रिकेटमध्ये त्याला चांगली संधी असल्याचे बोलले जाते.
भारतीय क्रिकेट संघाने चारशे धावांचा टप्पा ओलांडला: विश्वविक्रम
2026 साली झालेल्या या 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने चारशे धावांचा टप्पा ओलांडून 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विश्वविक्रम केला. चारशे धावांचा टप्पा ओलांडणारा भारत हा पहिला संघ ठरला.
इंग्लंडच्या कॅलेब फॉल्कनर ची अतुलनीय कामगिरी
भारताने 411 धावा केल्यानंतर इंग्लंडवर प्रचंड पण होते पण इंग्लंडच्या कॅलेब फॉल्कनर या युवा खेळाडूने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता मनमुराद खेळाचा आनंद घेतला आणि 67 चेंडूत 115 धुवांची धुवॉंधार खेळ केला. त्याच्या आकर्षक फटकेबाजीने प्रेक्षकांची मने जिंकली.