Rohit Pawar statement-अजितदादांचा घातपातच! रोहित पवार

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अनिल सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपातच असल्याचा आरोप अजित पवार यांचे तेरावे दिवस झाल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद जवळ जवळ पावणे दोन तास चालली. त्यांनी अजितदादांच्या अपघातावर सविस्तर माहिती व्हिडिओसह पत्रकारांना दिली.

*इस्रायलच्या मोसाद हेर संस्थेप्रमाणे घातपात*

इस्रायलची मोसाद हेर संस्था ज्या पद्धतीने आपल्या शत्रूला मारण्यासाठी उपाययोजना करते, त्या पद्धतीने अजितदादांचा घातपात केला असल्याचा आरोप भर पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी केला. नेत्याला मारण्याऐवजी ड्रायव्हरला संपवायचे म्हणजे आपोआप नेता संपतो. अशा पद्धतीचा मोसाद पॅटर्न आहे. हा पॅटर्न दादांच्या अपघातासाठी वापरला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

*पूर्व विदर्भातील एका नेत्यामुळे अजित दादांचे विमान उशिरा*

पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सह्या करायच्या असल्याने अजित दादांना 27 जानेवारी 2026 रोजी पुण्याला जाता आले नाही. त्यांनी आपला प्रवास पोस्ट फोन करून दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जाण्याचा बेत आखला. अर्थात हा पूर्व विदर्भातील नेता नेमका कोण? हे पाहिल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अंगुली निर्देश होतो. हा पूर्व विदर्भातील नेता जाणीवपूर्वक उशिरा आला का? आणि सकाळी सात वाजता निघणारे विमान अचानक बदल होऊन सव्वा आठ वाजता ते का निघाले? आयत्यावेळी पायलट, को पायलट का बदलले गेले? असे अनेक गंभीर प्रश्नपत्रिका परिषदेत रोहित पवार यांनी उपस्थित केले.

*रोहित पवार यांना आलेल्या शंका*

1 अजित दादा ज्या विमानाने जाणार होते त्या विमानाचे आयत्यावेळी पायलट आणिप को पायलट बदलले गेले.

2 विमान खाली येताना एका बाजूला कोलले होते. त्याचे नेमके कारण काय? काय विमानामध्ये काही दोष होता का?

3 विमान कोसळण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर शांभवी पाठक या शट् शट् अशा बोलल्या. पण त्या अगोदरचे संभाषण उपलब्ध नाही. याचे नेमके कारण काय?

4 सुमित कपूर या पायलटचे रेकॉर्ड चांगले नाही. दारू प्यायल्यामुळे त्याच्यावर तीन वर्षे बंदी होती. तरीसुद्धा अशा पायलटवर व्हीआयपी नेत्याची जबाबदारी कशी काय सोपवली होती? या मागचे नेमके कारण काय? सुमित कपूर हे आयत्यावेळी निवडलेले पायलट होते .त्यामुळे दादांच्या अपघाताबद्दल अधिकच संशय निर्माण होत आहे.

5 व्ही एस आर कंपनीच्या विमानांना युरोपामध्ये बंदी घातलेली आहे. हे माहिती असूनही भारतात मात्र व्हीएसआर कंपनीची विमाने अजूनही कशी काय चालू आहेत? आणि तीही व्हीआयपी लोकांसाठी कसे काय वापरत आहेत?

6 विमान कोसळते हे लक्षात आले असूनही मुख्य पायलट सुमित कपूर एकही शब्द बोलला नाही. या त्याच्या अबोलतेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

7 अजित दादांनी जे विमान वापरले त्या विमानाचे रुटीन मेंटेनन्स झाले होते का? केव्हा झाले होते? ते कोणी कोणी केले ?याचा सविस्तर अहवाल सादर करावा.

8 आपल्या जीवाला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये म्हणून दादा प्लास्टिकची बॉटल वापरत नसत .ते नेहमी भाषेची काचेची बॉटलच वापरत असत. हे रोहित पवार बोलत असताना त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीत सुई खुपसून दाखवली की प्लास्टिकच्या बाटलीतून कशाप्रकारे विषबाधा करता येते याचे त्यांनी उदाहरण दाखवून दिले.

*कुणाला मारायचे असेल तर आधी चालकाला मारा*

रोहित पवार यांनी ‘राईझ अँड किल फर्स्ट’ या पुस्तकाचा दाखला देत एखाद्या नेत्याला मारायचे असेल तर त्यांना प्रत्यक्ष न मारता त्याच्या चालकाला मारायचे म्हणजे आपोआपच नेत्याला मारले जाते. असे त्यांनी त्या पुस्तकाचा आधार घेऊन दाखला दिला.

Leave a comment