Tarique Rahman Bangladesh election-बांगलादेशात तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला स्पष्ट बहुमत

बांगलादेशात तब्बल दीड वर्षांच्या हंगामी सरकार नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. या पार्टीच्या त्यांच्या संसदमधील 300 पैकी 212 जागांवर विजय मिळाला आहे.त्यांचे प्रमुख स्पर्धक असलेल्या जमाती इस्लाम पक्षाच्या आघाडीला केवळ 77 जागा मिळाल्या आहेत. माजी पंतप्रधान बेगम खलिदा जिया यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत आणि त्यांचे पंतप्रधानपद जवळजवळ निश्चित आहे. बांगलादेशामध्ये सार्वत्रिक निवडणुकी बरोबरच अन्य 84 मुद्द्यांच्या आधारे निवडणूक झाली. यामध्ये बांगलादेशच्या नागरिकांनी बांगलादेश नॅशनल पार्टीच्या पारड्यात आपले मतदान देऊन त्यांना बहुमत मिळवून दिले.तारिक रेहमान हे बरेच वर्षे परदेशात होते. त्यांची आई बेगम खालिदा झिया या बरीच वर्षे तुरुंगात होत्या त्यांचे सुटका झाले होती हंगामी सरकारच्या काळात त्यांना तुरुंगातून मुक्त केले होते पण डिसेंबर 25 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

*84 मुद्द्यांच्या सुधारणावादी ठरावावरही सार्वमत*

बांगलादेशात क्रांतिकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी 84 मुद्द्यांचा सुधारणावादी ठराव सार्वमतासाठी खुला केला होता. यामध्ये सुधारणा मान्य असलेल्या 68% लोकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले;तर सुधारणा अमान्य आहे असे ज्यांना वाटते अशा 31 टक्के लोकांनी सुधारणावादी विचाराच्या विरोधी मतदान केले. यामध्ये बांगलादेश नॅशनल पार्टीला सुधारणावादी धोरणातला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

*बांगला देशातील नव्या सरकारमुळे भारत-बांगलादेश संबंधांकडे भारतीयांचे लक्ष*

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 साली बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर अनेक वर्ष भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने संबंध राहिले आहेत. सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने भारताशी चांगल्या पद्धतीने व्यवहार केला आहे.सध्या निवडून आलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या तारिक रहमान या नव्या पंतप्रधानांमुळे भारत-बांगलादेश यांच्यामध्ये संबंध कसे राहतील?याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a comment