अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर चर्चा करताना आणि भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या चर्चेवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलेच घेरले आहे .या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विपक्ष यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांना वारंवार बोलण्यास अडथळा निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार म्हणजेच केंद्र सरकारमध्ये समाविष्ट असलेले गृहमंत्री अमित शाह, संसदीय कार्यकारीमंत्री रिजूजी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही चौकडी करत आहे. आणि राहुल गांधी आपला मुद्दा सोडण्यास तयार नाही.त्यामुळे विपक्ष नेता राहुल गांधी आणि केंद्र सरकार यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*ट्रेड डील आणि एपस्टीन फाईल वरून तणाव*
राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेबाहेरही ट्रेड डीलवरून केंद्र सरकारवर टीकेची झोंड उठवली आहे .त्यांनी प्रखर शब्दात टीका केली आहे. भारताचे ट्रेड डील म्हणजे अमेरिकेला शरण जाणे अशा शब्दात त्यांनी या ट्रेड डीलवर वक्तव्य केले आहे. भारत विकताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असेही खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. राहुल गांधी यांचे कडाक्याचे भाषण पाहता केंद्र सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. अमेरिका भारताचे वस्तू आयात करताना 18 टक्के टॅरिफ लावते आणि भारत सरकार मात्र अमेरिकेच्या वस्तू भारतात विकताना शून्य टक्के टॅरिफ लावते . भारत सरकार त्याचा गौरव करत आहे. ही किती लांछनास्पद गोष्ट आहे हे राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.त्याचबरोबर दुसरा कळीचा मुद्दा म्हणजे एपस्टीन फाईल मध्ये भारताचे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी,उद्योगपती अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी यांची नावे आहेत या एपस्टीन फाईलवर चर्चा करत असताना राहुल गांधी यांना वारंवार रोखले गेले.एपस्टीन फाईल संदर्भात चर्चा करू दिली नाही;पण त्यामुळे या दोन गोष्टींमुळे केंद्र सरकारची संपूर्ण भारतभर नाचक्की झाली. राहुल गांधींच्या प्रभावी भाषणानंतर केंद्र सरकारचे पितळ उघडे पडले. हे जरी खरे असले तरी सरकारच्या चुका निदर्शनास आणून देणाऱ्याला कसे दडपले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्र सरकार आता राहुल गांधींच्या खासदारकीवर आक्रमण करत आहे. त्यांच्या खासदारकीवर बंदी घालण्यासाठी संसदेत ठराव मांडण्याच्या हालचाली केंद्र सरकार करत आहे. ही बाब खरोखरच दुर्दैवाची आहे. कारण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचे नाही असे केंद्र सरकारचा डाव आहे. लोकशाही नसून ही हुकुमशाही आहे.
*राहुल गांधी यांची प्रतिक्रिया*
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासंदर्भात संसदेत ज्या काही हालचाली सुरू आहेत आणि निशिकांत दुबे या भाजपाच्या खासदाराने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासंदर्भातचा प्रस्ताव मांडला आहे, यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की माझी खासदारकी रद्द करा किंवा माझ्यावर मुकदमा चालवा किंवा माझ्यावर एफ आय आर दाखल करा. मी शेतकऱ्यांसाठी आणि भारतीय जनतेसाठी लढतच राहणार आहे. मी थांबणार नाही