भारत पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील साखळी सामना होतो की नाही, यावर कितीतरी दिवस चर्चा रंगली होती;पण अखेर श्रीलंकेतील कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 मधील पहिली लढत झाली. यामध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला.
पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता; पण अखेर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला आणि हा सामना कोलंबो येथे पार पडला. त्यामध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उवडला. सुरुवातीला प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. धावांचा आकडा पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्या चुरशीचा सामना होईल असे चित्र दिसत होते; पण पाकिस्तानची जेव्हा खेळण्याची वेळ आली त्यावेळी पहिल्या षटकातच एक गडी बाद झाला. दुसऱ्याही षटकात एक गडी बाद झाला आणि पाकिस्तानवर प्रचंड दडपण आले. पाकिस्तानचा डाव 114 गावात गुंडाळला आणि त्यामुळे भारताने 61 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला.
*इशांत किशनची उल्लेखनीय कामगिरी*
इशांतने 40 चेंडूत 77 धावा ठोकल्या. यामध्ये तीन षटकार आणि दहा चौकारांचा समावेश आहे. इशांतच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ईशानचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.