मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.खरं तर इतिहासाचे ज्ञान नसलेल्या अनेक राजकीय पुढार्यांनी त्याचे भांडवल केले आहे. टिपू सुलतान हे कोण होते? त्यांनी काय कार्य केले?याबद्दल थोडे तरी माहिती असायला हवे.
*टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते: हर्षवर्धन सपकाळ*
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतांबाबत एक विधान केले , की टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते.त्यांनी इंग्रजांशी प्रखर लढा दिला. ते केवळ धार्मिक नेते नव्हते, तर ते समाज सुधारक होते. त्यांचे कार्य शिवरायांच्या समकक्ष होते त्यांचे जन्मभूमीवर प्रचंड प्रेम होते. म्हणूनच इंग्रजांशी लढता लढता त्यांनी आपले प्राण गमावले.जर त्यांना आपले प्राण वाचवायचे असते तर कधीच त्यांनी इंग्रजांशी हात मिळवणी करून गुलामगिरी पत्करून त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले असते; पण टिपू सुलतानाने तसे केले नाही. त्यांनी स्वाभिमानाने लढाई दिली आणि त्यात ते बलिदान पावलेत. हा इतिहास ज्याने वाचलाच नाही ते टिपू सुलतान बद्दल वाटेल ते बरळत आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे अशी अनेक माणसे इतिहासाचे ज्ञान पाजळून हर्षवर्धन सपकाळ यांना बदनाम करत आहेत. आणि महाराष्ट्रातील इतिहासाचे ज्ञान नसणारे अनेक अंधभक्त हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेला नावे ठेवत आहेत. यासारखी दुर्दैवी बाब ती कोणती?
*पुण्याच्या महापौराने शाहू महाराजांच्या फोटोला हार घातलाच नाही*
पुण्याच्या महापौरपदी निवड झालेल्या एका महिला महापौरांनी महापालिकेच्या दालनात असलेल्या अनेक फोटोंना हार घातले; पण शाहू महाराज यांच्या फोटोला मात्र हार घातला नाही. ही केवढी महान चूक आहे ;पण त्यावर कोणत्याही अंधभक्त व राजकीय पुढारी काहीही बोलत नाहीत.हा शाहू महाराजांचा इतिहास माहीत नाही का? हेडगेवार यांचे काय कार्य आहे? म्हणून त्यांचा फोटो पुण्यातील महापालिकेच्या इमारतीत लावला आहे. खरे तर हेडगेवार हे संघाचे अध्यक्ष होते. आणि संघाने कधीच देशासाठी काहीही केले नाही. उलट देशात भ्रम निर्माण करणे ,दुही माजवणे या पलीकडे आरएसएसचे कार्य नाही. हा खरा इतिहास कोण वाचेल का?आणि खरा इतिहास लोकांसमोर कधी येणार?
पेशव्यांच्या काळात पेशव्यांनी हिंदूंच्या लोकांना कशाप्रकारे त्रास दिला आणि टिपू सुलतानने या हिंदू लोकांना कसे वाचवले आणि संरक्षण दिले हा इतिहास ही देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यासारख्या मंडळींनी वाचावा. महाराष्ट्रातील जनतेनेही खरा इतिहास वाचण्याची सवय लावून घ्यावी