भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये टी 20 ही आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी सुमार राहिली आहे. अन्य देशांबरोबर श्रीलंकेकडूनही ऑस्ट्रेलिया देश पराभूत झाल्यामुळे सुपर आठमध्ये पोहोचण्यास या संघाला खूप मोठा अडथळा निर्माण होणार आहे. असे झाले तर टी 20 च्या इतिहासात ऑस्ट्रेलिया प्रथमच सुपर आठमध्ये नसणार आहे. ही बाब ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने दुर्दैवाची ठरणार आहे.