MMRDA Third Mumbai Development-तिसऱ्या मुंबईच्या कामाला गती: एमएमआरडीए

मुंबई( बृहन्मुंबई), नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई स्थापन होत आहे.ही मुंबई रायगड जिल्ह्यामध्ये स्थापन स्थापन होत असून या मुंबईच्या स्थापनेसाठी आणि विकास कामासाठी 4000 कोटी म्हणून अधिक रुपयांची तरतूद केली आहे, असे एमएमआरडीए म्हटले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सन 2026 27 च्या अंदाजपत्रकात तिसऱ्या मुंबईसाठी सुमारे चार हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. ही मुंबई रायगड जिल्ह्यातील कर्नाळा-साई-चिरनेर पट्ट्यात होणार असून रायगड जिल्ह्याचा हा काही भाग तिसऱ्या मुंबईला जोडला जाणार आहे. जसे मुंबईपेक्षा नवी मुंबईची रचना आकर्षक आणि नियोजनबद्ध झाली आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या मुंबईची रचना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत आकर्षक, नियोजनबद्ध, तंत्रशुद्ध आणि नीटनेटकेपणा यामध्ये दिसणार आहे. ही मुंबई लवकरच स्थापित होईल आणि ही मुंबई जुन्या नव्या मुंबईला जोडली जाईल.

Leave a comment