Tariq Rehman Prime Minister Oath-तारिक रेहमान घेणार पंतप्रधान पदाची शपथ

मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी बांगला देशाचे नवे पंतप्रधान म्हणून तारिक रेहमान हे शपथ घेणार आहेत. बांगलादेशातील हे पहिलेच पंतप्रधान असे आहेत की त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी तुरुंगवास भोगाव लागला होता. तारिक रेहमान हे वीस वर्षे बांगलादेशाच्या बाहेर होते. शेख हसीना यांचे सरकार उलटवल्यानंतर बांगला देशात क्रांती झाली आणि तारिक रेहमान हे पंतप्रधानाचे सूत्रे हातात घेत आहेत. शेख हसीना यांच्या कारकीर्दीत बेगम खलिदा झिया यांच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप होते. त्यामुळेच तारीक रेहमान हे देशाबाहेर होते.

*शपथविधीला भारताला निमंत्रण*

भारताशी बांगलादेशाचे संबंध चांगले रहावेत अशी आज तरी तारिक रेहमान यांची इच्छा दिसते. आणि त्याच हेतूने बांगलादेशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिले आहे. पण नरेंद्र मोदीऐवजी भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Leave a comment